मुंबई: टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला 'बागी 3' (Baaghi 3) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या दिवसांतील कमाईत या चित्रपटाने अजय देवगणच्या 'तानाजी: द अनसंग वॉरियर (Tanhaji The Unsung Warrior)' या चित्रपटालाही मागे टाकले आहे.  बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या माहितीनुसार, शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'बागी 3' (Baaghi 3) चित्रपटाने १७.५० कोटीचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 'बागी 3' (Baaghi 3) ने जवळपास १५.५ ते १६ कोटीची कमाई केल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांच्या एकत्रित कमाईचा हा आकडा ३३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता 'बागी 3' (Baaghi 3) पहिल्याच विकेंडमध्ये ५० कोटीचा व्यवसाय करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बागी 3' (Baaghi 3) २०२० मधील सर्वाधिक जास्त ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 'तानाजी: द अनसंग वॉरियर (Tanhaji The Unsung Warrior)' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५.१० कोटी, 'लव्ह आज कल'ने १२.४० कोटी, 'स्ट्रीट डान्सर 3D' ने १०.२६ कोटी आणि 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाने ९.५५ कोटी रूपयांची कमाई केली होती. मात्र, 'बागी 3' (Baaghi 3) ने या सगळ्यांना मागे टाकत पहिल्याच दिवशी १७.५० कोटींचा गल्ला जमवला होता. 



कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोक सावर्जनिक ठिकाणी जाणे टाळत असल्याने बॉलिवूडला त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, 'बागी'ने ही शक्यता धुळीस मिळवली आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी 'बागी ३' चित्रपटाला ब्लॉकबास्टर घोषित केले आहे.