टायगर श्रॉफचा रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, लग्नाचा प्लॅनही सांगितला
अनेक सेलिब्रिटींनंतर टायगरही चढणार बोहल्यावर, काय आहे त्याची लग्नासाठी प्लॅनिंग? म्हणाला...
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ कायम त्यांच्या फिटनेसमुळे चर्चत असतो. टायगर नेहमी त्याच्या अभिनयाने आणि डान्समुळे प्रेक्षकांच्या मनात राज्य करतो. एवढंच नाही तर टायगर त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. टायगर अभिनेत्री दिशा पटानीला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी कधीचं नात्यावर भाष्य केलं नाही. पण आता टायगरने रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकताचं 'द कपिल शर्मा शो'मध्ये टायगरने रिलेशनशिप स्टेटस आणि लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितलं आहे.
टाइगर श्रॉफ नुकताचं कपिल शर्मा शो (Kapil Sharma Show)मध्ये उपस्थित राहिला होता. ज्याठिकाणी साजिद नाडियाडवाला, कृति सेनन (Kriti Sanon) आणि अहान शेट्टी (Ahan Shetty) यांच्यासोबत नाडियाडवालाची पत्नी देखील उपस्थित होती.
यावेळी साजिद नाडियाडवालाची पत्नीने कपिलला त्याच्या लग्नाबद्दल विचारते. त्यानंतर टायगरला देखील त्याच्या लग्नाबद्दल विचारते. तेव्हा टायगर सिंगल असल्याचं सांगतो. टायगरचं वक्तव्य ऐकून सर्वांना हसू येतं. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
त्यानंतर टयगर लग्नाबद्दल म्हणते, सध्या तरी लग्नाची कोणतीही प्लॅनिंग नाही.... टायगरने धक्कादायक खुलासा केल्यानंतर चाहत्यांना अभिनेत्याच्या लग्नाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.