एन्जलची टीक-टॉक व्हिडिओ करत थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री
सोशल मीडियाचं जाळं आता सर्वत्र पसरलं आहे.
मुंबई : सोशल मीडियाचं जाळं आता सर्वत्र पसरलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरूण मंडळींना आपलं कौशल्य जगासमोर सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यात टीक टॉक तर सर्वांच्या आवडतीचा विषय आहे. टीक-टॉकच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली एन्जल राय आता थेट बॉलिवूडमध्ये पोहोचली आहे.
झी म्यूझीक द्वारा नुकताचं प्रदर्शित करण्यात आलेल्या 'रांझणा' गाण्यात तिने अभिनय केलं आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक जुबीन गर्गसोबत तिने 'आनेवाला पल' या गाण्याला आवाज देखील दिला आहे.
दिल्लीमध्ये राहणाऱ्या एन्जलचा पहिला व्हिडिओ 'जब छाए मेरा जादू' सारेगामाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला होता. टीक-टॉकच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या एन्जलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.