Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यात अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. काही सेलिब्रिटींचं यंदाच्या वर्षी लग्न झालं आहे तर काही सेलिब्रिटी हे आता लग्न बंधनात अडकणार आहेत. मराठी सेलिब्रिटींविषयी बोलायचं झाल तर नुकतीच अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी सप्तपदी घेतल्या. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे ही देखील लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तितीक्षा तावडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिद्धार्थसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची घोषणा त्यांनी केली आहे. तितीक्षानं ऑफ व्हाईट आणि निळ्या , गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर सिद्धार्थनं ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत तितीक्षानं कॅप्शन दिलं की त्यानं मला डेटसाठी बोलावलं, पण नंतर पाहिलं तर ते केळवण निघालं. ही पोस्ट शेअर करत तितीक्षानं कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोटीकॉन वापरलं आहे. 



तितीक्षा आणि सिद्धार्थच्या केळवणाला सुरुवात झाली असली तरी त्यांच्या लग्नाची तारिख अजून कळलेली नाही. दरम्यान, तितीक्षानं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री भक्ती रत्नपारखी कमेंट करत म्हणाली, 'कधीपासून याची वाट पाहत होते. तुमच्या दोघांसाठी मी खूप आनंदी आहे. ' लेखक प्राजक्त देशमुख कमेंट करत म्हणाला, 'तरी बरका मला शंका होतीच'. ऋतुजा बागवे कमेंट करत म्हणाली, 'तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनला आहात.' रसिका सुनिल म्हणाली, 'अखेर, वावा...., खूप आनंदी आहे.'


हेही वाचा : अनन्याचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आली उर्फीची आठवण म्हणाले, 'अरे, ही तर उर्फीची बहीण जुर्फी'


तितीक्षा आणि सिद्धार्थ विषयी बोलायचे झाले तर ते दोघं खूप जुने मित्र आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत ते दोघं महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघे नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसले. आता या दोघांनी थेट लग्नाची घोषणा केली आहे. सिद्धार्थ अजय देवगणसोबत 'दृश्यम 2' या चित्रपटात दिसला होता.