Mamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेवर भाष्य करणारं एक गाणं मूळचा बंगली असलेला प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने रिलीज केलं आहे. 'आर कोबे' असं या गाण्याचं नाव आहे. या पीडित डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी अरजितने केली आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने वादग्रस्त विधान करत थेट बदलापूरमधील घटनेचा उल्लेख केला आहे.


अरजितवर केली टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी अरजित सिंगवर टीका केली आहे. अरजितने बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणावर गाणं प्रदर्शित केलं नाही का? असा सवाल घोष यांनी उपस्थित केला आहे. आपल्या एक्स हॅण्डलवरुन घोष यांनी बंगली भाषेत या गाण्यावरुन अरजितवर निशाणा साधला आहे. "अरजित सिंग हा उत्तम गायक आहे. तो एक उत्तम व्यक्तीही आहे. तो पीडितेसाठी न्याय मागत असल्याचं गाणं अगदी योग्य आहे. मी त्याच्या मागणीला पाठिंबा देतो," असं घोष यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की...


मात्र पोस्टमध्ये पुढे बोलताना, "मात्र अरजितसंदर्भात प्रॉब्लेम हा आहे की त्याचा जाणीवा केवळ बंगलासंदर्भात जाग्या होतात. तो तिथे (मुंबईत) काम करतो तरी त्याने कधी महाराष्ट्रामधील बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणासंदर्भात गाणं प्रदर्शित केलं नाही. किंवा कुस्तीपटू साक्षी मलिकसंदर्भात गाणं प्रदर्शित केलं नाही. त्याचं काम, पैसा आणि करिअर हिंदी चित्रपटाशी संबंधित आहे," असं घोष यांनी म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> 'सिरीअल स्कर्ट चेसर' विधानावर कंगना ठाम! म्हणाली, '...जसा काही तो स्वामी विवेकानंद आहे'



हे गाणं सर्व महिलांसाठी आणि डॉक्टरांसाठी असं अरजित म्हणालेला


हे गाणं शेअर करताना अरजितने, "हे गाणं न्याय मिळवण्यासाठी एक आक्रोश गीत आहे. हे मूकपणे सारं काही सहन करणाऱ्या असंख्य महिलांसाठी एक विलाप आणि बदलाची मागणी करणारं गाणं आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे की त्या डॉक्टरला न्याय मिळावा. आम्ही त्या तरुण डॉक्टरांला श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व महिलांसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत. लैंगिक हिंसेची भयानकता दर्शवण्याबरोबरच आमचे गाणे देशभरातील डॉक्टरांच्या आवाज प्रतिध्वनित करत आहे. हे डॉक्टर जीवावरील धोके सहन करूनही अथक सेवा करत असतात," असं म्हटलं आहे. अरजितच्या या गाण्याचं आणि त्याने दाखवलेल्या संवेदनशिलतेचं चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे.