मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लोकांचा हा शो खूप फेवरेट आहे. या शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. लोकं या शोशी इतके जोडले गेले आहेत की, कोणीही या शोच्या कलाकारांना डोळे बंद करुनही ओळखू शकतं. पण आज आम्ही तुमच्यासोबत एक असा फोटो शेअर करणार आहोत  जो पाहून तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज जो आम्ही तुमच्या सोबत फोटो शेअर करणार आहोत. तो फोटो आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील महत्त्वाच्या कलाकाराचा, जो गेल्या 13 वर्षांपासून शोमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून शैलेश लोढा म्हणजेच तुमचे लाडके मेहतासाहेब आहेत. हा फोटो पाहून तुमचाही विश्वास बसत नाहीये ना? पण होय हे खरं आहे.



सोशल मीडियावर फोटो शेअर 
हे फोटो स्वतः शैलेश लोढा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून ते शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, या फोटोत तो स्वत:लाही ओळखू शकत नाही. या फोटोमध्ये शैलेश लोढा खूपच बारिक दिसत आहे आणि तो खूपच बदललेला दिसत आहे. शैलेश लोढा याचा हा फोटो तारक मेहता का उल्टा चष्मा सुरू होण्यापूर्वीचा म्हणजेच 2008 आधीचा आहे. शैलेश लोढा यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे आणि त्याची खूप चर्चा होत आहे.


तारक मेहताची भूमिका साकारत आहे
शोमध्ये शैलेश लोढा लेखक तारक मेहताच्या भूमिकेत दिसत आहे जो जेठालालचा चांगला मित्र आहे. त्यांची व्यक्तिरेखा आणि या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. याच कारणामुळे शोमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेलाही खूप प्रेम मिळत आहे.