मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा देशाच्या आवडत्या शोपैकी एक आहे. हा शो निश्चितपणेच सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम बनला आहे. हा शो केवळ मित्र आणि कुटुंबांना एकत्र आणत नाही. तर शोचे कलाकार देखील एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आता चाहते असा अंदाज लावत आहेत की मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी आणि राज अनाडकट अर्थात टप्पू हे फक्त मित्र नाहीत तर एकमेकांचे खूप खास आहेत. म्हणून जेव्हा राजने सोशल मीडियावर मुनमुनच्या चर्चेला उत्तर दिलं. तेव्हा एका चाहत्याने मजेदार पद्धतीने एक विनोद केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं
हे कोणतं रहस्य नाही की, मुनमुन दत्ता आणि राज अनादकट हे दोघं पडद्यावरचे चांगले मित्र आहेत. ते अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. मात्र, त्यांच्या या शब्दांमुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य वाटलं की, त्यांच्यामध्ये काही चाललं आहे का! आता पुन्हा एकदा ही गोष्ट पकडली गेली आहे. ज्याचं कारण म्हणजे मुनमुनने केलेल्या कमेंटवर राजचं उत्तर.



आता एक्टर्सची चॅटिंग चाहत्यांनी पकडली आहे.  एका युजरने लिहिले, '@raj_anadkat फक्त त्यांना उत्तर द्या, हे चुकीचं आहे'. आणखी एका युजरने मुनमुनच्या कमेंटकडे बोट दाखवत लिहिलं, '@mmoonstar आला आहे कमेंट'. मुनमुन आणि राज अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर खूप प्रशंसा करतात आणि चाहते दोघे डेटिंग करत असल्याचा अंदाज लावत राहतात, जरी दोघांनीही असे कोणतेही संकेत दिले नाहीत.