मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या (Marathi Movie) पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे (Anand Dighe) कळाले.  कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. नुकतंच या सिनेमाचं शुटिंगला सुरुवात झाली आहे. याचीच एक झलक अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच प्रसादने एक पोस्ट त्याच्या इन्स्टावर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रसादने लिहीलं आहे की,  'धर्मवीर - २' मधून उलगडणार ' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ' ... रसिक प्रेक्षकहो सज्ज व्हा बहुप्रतीक्षित '' धर्मवीर - २ '' चित्रपट लवकरच येतोय आपल्या भेटीला... यासोबतचं त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या BTS व्हिडीओच्या माध्यामातून प्रेक्षकांना या सिनेमाची झलक पहायला मिळत आहे. 


13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तुफान मजल मारली. मात्र धर्मवीर सिनेमाच्या  प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शुटिंग सध्या सुरु आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. "धर्मवीर" चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी 'धर्मवीर २' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच  "धर्मवीर २" या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला होता. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.  येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे चित्रकपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 


मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे "धर्मवीर २" चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे.