2023 सुपरहिट होण्यासाठी देओल कुटुंबानं केली पूजा? बॉबीनं केला खुलासा
Bobby Deol : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 2023 हे देओल कुटुंबासाठी सुपरहिट ठरलं याविषयी सांगितलं आहे.
Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका जणू प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात बॉबीचा एकही डायलॉग नव्हता. अशात फक्त आपल्या अभिनयाची बाजू खूप स्ट्रॉन्ग असायला हवी. अशात बॉबी हा एक उत्तम अभिनेता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्यातही हे वर्ष फक्त बॉबी देओलसाठी नाही तर संपूर्ण देओल कुटुंबासाठी जबरदस्त ठरलं आहे. या वर्षी देओल कुटुंबाच्या तिन्ही पिढी बॉलिवूडमध्ये छाप सोडली.
देओल कुटुंबाचं हे वर्ष पाहता बॉबीला 'आजतक'च्या मुलाखतीत विचारण्यात आलं की 'त्यासाठी देओल कुटुंब हे कुठे देवाच्या दर्शनासाठी गेले होते का? की कोणती पूजा केली होती?' त्यावर उत्तर देण्याआधी बॉबी हसला त्यानंतर तो म्हणाला 'ही सगळी कर्माची फळं आहेत. कारण गेल्या जन्मी मी नक्कीच काही चांगलं काम केलं असणार.'
धर्मेंद्र यांचा चित्रपट
या वर्षाच्या सुरुवातील धर्मेंद्र यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील धर्मेंद्र यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यातही त्यांचा आणि शबना आजमी यांचा किसींग सीन सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
सनी देओल
धर्मेंद्र यांच्यानंतर सनी देओलचा 'गदर 2' चित्रपट प्रदरर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तर गदर केला होता. या चित्रपटानंतर सनी देओलला चांगला फीडबॅक मिळाला. इतकंच नाही तर त्याला सोशल मीडियावर देखील चांगली प्रतिक्रिया मिळते.
बॉबीचा चित्रपट
वडील आणि मोठा भाऊ सनीनंतर बॉबी देओलचा चित्रपट प्रदर्शित झाला. तो म्हणजे 'ॲनिमल' या चित्रपटानं तर सगळ्यांना वेड लावलं आहे. 'ॲनिमल' मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या बॉबीनं सगळ्यांची मने जिंकली आहे. त्याची अबरार ही भूमिका खूप छोटी असली तरी देखील प्रेक्षकांना त्याला स्क्रिनवर पाहायचे होते.
हेही वाचा : रुसलेल्या आराध्याला मनवण्यासाठी अमिताभ देतात 'ही' भेट
या तिघांशिवाय सनी देओलचा छोटा मुलगा राजवीर देओलनं देखील या वर्षी दोनों या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामुळे देओल कुटुंबासाठी हे वर्ष थोडक्यात खूपच चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही.