Rani Mukherji ची लव्हस्टोरी : आदित्यचं घर तोडल्याचे झाले आरोप, पण...
राणी आणि आदित्य यांनी 2014मध्ये लग्न केलं. राणीसोबत आदित्यचं दुसरं लग्न आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नातं कोणासोबत जुळलं जावू शकतं हे सांगणं किंवा म्हणणं फार कठिण. आपल्या आवडीच्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. तर आज अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत तिच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. राणी आज प्रसिद्ध अभिनत्रींपैकी एक आहे. तिचं फिल्मी करियर जेवढं चर्चेत होतं, तेवढचं तिचं खासगी आयुष्य देखील चर्चेत होत. तिच्यावर पती आदित्य चोप्राचं घर तोडण्याचं देखील आरोप करण्यात आले.
प्रसिद्ध निर्माते आदित्या चोप्रा, यशराज चोप्रा यांचे पूत्र आहेत. अदित्य आणि राणी या दोघांना देखील लाईम-लाईटपासून लांब राहायला आवडतं. म्हणूनचं त्यांची लव्हस्टोरी कित्येकांना माहित नाही. फार कमी चाहत्यांना त्यांच्या लव्हलाईफ बद्दल माहित आहे. 2014 रोजी रणी आणि आदित्य विवाह बंधनात अडकले.
पण म्हत्त्वाचं म्हणजे आदित्यचं पहिलं लग्न 2000 साली पायल खन्नासोबत झालं हेतं. दरम्यान, आदित्य आणि राणी यांची घट्ट मैत्री झाली आणि कालांताराने त्याच्या मैत्रीची जागा प्रेमाने घेतली. तेव्हा राणीवर आदित्यचं घर तोडल्याचं देखील आरोप झाले. त्यानंतर 2009 साली पायल आणि आदित्य विभक्त झाले.
आदित्य आणि पायल विभक्त झाल्यानंतर राणी आदित्यच्या आयुष्यात आली असं सांगितलं जात आहे. पण सर्व गोष्टींवर आदित्यने दुर्लक्ष केलं आणि 2014 साली आदित्य आणि राणी इटलीत लग्न केलं. आता त्यांना 1 मुलगी आहे तिचं नान ‘आदिरा’ असं आहे.