मुंबई : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा सिनेमा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' गतवर्षी रिलीज झाला. या सिनेमाला सगळ्यांची पसंती मिळाली. या सिनेमात देशातील गंभीर समस्या शौचालय. यावर हा सिनेमा असून त्याचे प्रातिनिधीक उदाहरण यात दाखविण्यात आलेय. दरम्यान, शुक्रवारी हा सिनेमा चीनमध्ये रिलीज करण्यात आला. हा सिनेमा चीनमध्ये 'टॉयलेट हीरो' या नावाने रिलीज करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट केल्याप्रमाणे या सिनेमाने चीनमध्ये पहिल्या दिवसी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवलाय. २.३६ मिलियन डॉलर अर्थात १५.९६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, विकएंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे लक्ष लागले आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळालाय. ११,५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झालाय.



'टॉयलेट: एक प्रेम कथा' हा सिनेमा श्री नारायण सिंह या दिग्दर्शित केलाय. त्याचा हा सिनेमा पदार्पणात त्याने मोठे यश मिळवलेय. हा सिनेमा २२ कोटींमध्ये तयार करण्यात आलाय. या सिनेमाने १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. 


या सिनेमात शौचालयाची समस्या मांडण्यात आलेय. अक्षय कुमार याने सामाजिक संदेश देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेय. तसेच ही भूमिका अक्षयने मोठ्या मनोरंजन प्रकारे निभावली आहे. हा सिनेमा केशव आणि जया यांच्या प्रेम शादीची आहे. केशव आणि जया लग्न करतात. मात्र, केशवच्या घरी शौचालय नसल्याने जया त्याला सोडून  जाते. दरम्यान, केशव शौचालय बनविण्यासाठी कुटुंबीयांच्या विरोधात जातो. मात्र, त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.