मुंबई : ९० च्या दशकातील लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांना पोट धरून हसायला लावणारा एकमेव कार्टून म्हणजे ‘Tom And Jerry’. पण ज्याने आपल्याला हसायला भाग पाडलं तो मात्र या जगाला सोडून गेला आहे. ‘Tom And Jerry’चे दिग्दर्शक  जीन डेच (Gene Deitch) याचे निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. १६ एप्रिल रोजी चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरातील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. जीन यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं.  त्यांच्या मृत्यूची बातमी चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल (Petr Himmel) यांनी दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीन डेच यांनी लष्कारासाठी देखील काम केले आहे. शिवाय त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. परंतु त्यानंतर आरोग्याशी निगडीत अडणींमुळे त्यांना हे क्षेत्र सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा ऍनिमेशन विश्वाकडे वळवला आणि संपूर्ण जगाला ‘Tom And Jerry’हा कार्टून मिळाला. आजही ‘Tom And Jerry’च्या त्या आठवणी कोणताच देश विसरू शकत नाही. 


त्यांनी ‘Tom And Jerry’चे १३ एपिसोड्स बनवले होतं. पोपॉय (Popeye) कॉर्टून सिरीजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मनीत देखील करण्यात आलं होतं. जीन यांच्या मागे त्यांची पत्नी आणि पहिल्या पत्नीची तीन मुले असा परिवार आहे.