Tom & Jerry Trailer : २९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार खास जोडी
पुन्हा एकदा अनुभवता येणार बालपण
मुंबई : पुन्हा एकदा अनुभवता येणार Tom & Jerry ची धम्माल. Tom & Jerry च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. ९० व्या दशकातील मुलांवर जादू केलेल्या या Tom & Jerry चा सिनेमा येत आहे. Tom & Jerry चा Trailer लाँच झाला आहे. २०२१ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tom & Jerry आता घरात नाही तर एका हॉटेलमध्ये माणसांमध्ये राहून हे दोघे धम्माल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. हे दोघे पुन्हा एकदा तीच मस्ती करणार आहेत पण तीही मोठ्या पडद्यावर.
५ मार्च २०२१ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २९ वर्षांनंतर प्रेक्षकांना ही संधी मिळणार आहे. या अगोदर १९९२ मध्ये 'टॉम एँड जेरी- द मूवी'
हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे.