Tom Cruise Speaking in Hindi: हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ ही काही केल्या संपत नाही. यावर्षीही मोठे हॉलिवूड चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. टॉम क्रुझ या जगप्रसिद्ध अभिनेत्याचा 'मिशन इमपॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तेव्हा या चित्रपटाची चांगलीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. अशावेळी आता प्रेक्षकांना या चित्रपटातून टॉम क्रुझची कोणती नवी झलक पाहायला मिळणार याची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तेव्हा तो अनेक मुलाखतींमध्ये व्यग्र आहे. अशाच एका मुलाखतीतून त्यांनं आपल्या हिंदी बोलण्याच्या कौशल्यानं सर्वांनाच इंप्रेस करू सोडलं आहे. यावेळी तो दोन शब्द बोलतो परंतु त्याच्या इतक्या शुद्ध हिंदी उच्चारानं भारतीय चाहते फिदा झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''नमस्ते! आप कैसे है?'' असे दोनच शब्द तो बदलतो परंतु त्याच्या या दोन शब्दांनीही असं वाटतंच नाही की तो परदेशी आहे. त्यांच्या शुद्ध उच्चारांमुळे सगळेच त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. सध्या त्याचा या मुलाखतीतील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यावेळी मुलाखत घेणाऱ्या महिलेनं त्याला प्रश्न विचारला की तुम्ही हिंदीमध्ये बोलू शकता का? त्यावर तो म्हणाला की, नक्कीच तुम्हाला ऐकायचे आहे का? तुम्हाला आवडेल का मी हिंदीत बोलेलं तर मी नक्कीच बोलेन'' त्यावर ती महिला त्याला प्रश्न विचारते की तुम्ही ''नमस्ते! आप कैसे है?'' हे बोलू शकता? तेव्हा तो आधी नमस्ते असं म्हणतो आणि मग आप कैसे है? असं म्हणतो. त्यावर ते दोघंही आनंदानं हसतात. 


हेही वाचा - एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?


त्याच्या या गेश्चरनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याच्या या व्हिडीओवर नाना तऱ्हेच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. टॉम क्रुझचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा चित्रपट 12 जूलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 



रेबेका फर्गुसन, साइमन पेग, हेले एटवेल, वैनेसा किर्बी, हेनरी कज़र्नी, पोम क्लेमेंटिएफ़, एसाई मोरालेस, शी व्हिघम, ग्रेग टार्ज़न डेविस, कैरी एल्वेस, फ्रेडरिक श्मिट आणि मारिएला गैरिगा यांचाही या चित्रपटात समावेश आहे.  'मिशन इमपॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट टू' हा चित्रपट 28 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.