मुंबई : लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. लग्नाच्या दिवशी आपल्या आयुष्यात नव्या वक्तीची एन्ट्री होणार म्हणून प्रत्येक जण आनंदी असतो. पण प्रसिद्ध गायकावर दुखःचं डोंगर कोसळलं आहे. 'एक्स फॅक्टर' फेम गायक Tom Mann च्या होणाऱ्या पत्नीचं निधन लग्नाच्याच दिवशी झालं आहे. टॉम त्याची मंगेतर डॅनियल हॅम्पसनशी (Danielle Hampson ) लग्न करणार होता. पण  लग्नाच्याच दिवशी तिने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती गायकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉमने होणारी पत्नी आणि आठ महिन्यांच्या मुलासोबत काही फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. 'आज मी माझ्या भावना अशा प्रकारे व्यक्त करत आहे, यावर विश्वास बसत नाही. माझी बेस्ट फ्रेंड, माझ सर्वकाही असणारी  डॅनी शनिवारी सकाळी 18 जून रोजी मला सोडून गेली.'



पुढे टॉम त्यांच्या 8 महिन्यांच्या मुलाची चिंत व्यक्त करत म्हणाला, 'मी कदाचित मुलाचा तुझ्यासारखा सांभाळ नाही करु शकणार, पण आपण ज्याप्रकारे मुलाचं संगोपण केलं आहे, तसंच मी यापुढे करेल. मी त्याला सांगेल त्याची आई किती अद्वितीय होती'


पोस्टच्या शेवटी, टॉमने लिहिले आहे की, तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात अंधार आहे. टॉमने होणाऱ्या पत्नीच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या, पण मृत्यूचं कारण सांगितलेलं नाही.