Too Hot To Handle: मादक सौंदर्याच्या बाबतीत `ही` अभिनेत्री चार नव्हे, दहा पावलं पुढे
कलाविश्वापासून दूर असूनही ती चर्चेत
मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्रीनं सध्या मात्र या झगमगाटापासून दुरावा पत्करला आहे. असं असलं तरीही ती चर्चेत मात्र कायम आहे. सातत्यानं फिटनेस आणि आरोग्यावर भर देणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. (Too Hot Shveta Salves bedroom to bikini photos)
चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री आहे, श्वेता साळवे. वयाच्या 37 व्या वर्षीसुद्धा श्वेताचं मादक सौंदर्य तसुभरही कमी झालेलं नाही. तिचे फोटो पाहता भल्याभल्या अभिनेत्रींपेक्षा ती चार नव्हे, दहा पावलं पुढे आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
श्वेताचा मोनोकिनी लूक तुम्हाला कसा वाटला, समुद्रकिनारी या लूकमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. मोनोकिनीच नव्हे, तर बिकीनीमध्येही ती तितकीच सुंदर दिसली.
बेडरून फोटो शेअर करणं असो किंवा आणखी कोणता खासगी फोटो, श्वेतानं तो शेअर करताच चर्चा झाली नाही, असं फारच क्वचित घडतं. योगसाधना, योग्य आणि संतुलित आहार आणि बेफिकीर जगणं हा तिच्या फिटनेसचा मंत्र असावा हे तिचं सोशल मीडिया अकाऊंट पाहून लक्षात येतं.
डीपनेक गाऊन, शिमरी शर्ट किंवा मग आणखी कोणतंही बोल्ड आऊटफिट श्वेतात तितक्याच सुंदररित्या फ्लाँट करते. तिचा यापैकी कोणता लूक तुम्हाला आवडला?