मुंबई : 2021 मध्ये अनेक स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आले आहेत. जेव्हा अनेक स्टार्सच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा अनेक सेलिब्रिटी इतर कारणांमुळेही चर्चेत राहिले. दरम्यान, Yahoo ने मोस्ट सर्च केलेल्या सेलेब्सची यादी (Yahoo 2021 Most Searched Celeb List) जारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामध्ये इंटरनेटवरील सर्चनुसार सेलेब्सना कोणते स्थान देण्यात आले आहे हे सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे या यादीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचेही नाव आहे.


या यादीत सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


या यादीत शाहरुखचा मुलगा आर्यनचाही समावेश 


Yahoo च्या या यादीतील टॉप न्यूजमेकर श्रेणीमध्ये, 'इंडियन फार्मर्स प्रोटेस्ट' वरच्या स्थानावर आहे. त्याचबरोबर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दुसऱ्या स्थानावर आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर तो खूप चर्चेत असल्याची माहिती आहे. नुकतीच न्यायालयाने त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका केली आहे.


सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पुरुष अभिनेत्यांच्या यादीत, छोट्या पडद्यावरील चेहरा आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे नाव सर्वात वर आहे.


हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचा मृत्यू झाला, त्यानंतर अनेक दिवस त्याची चर्चा होती. या यादीत सलमान खान दुसऱ्या, अल्लू अर्जुन तिसऱ्या, दिवंगत पुनीत राजकुमार चौथ्या आणि दिलीप कुमार पाचव्या क्रमांकावर आहे.


फिमेल स्टार्सबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कतरिना कैफ आहे. दुसरीकडे प्रियांका चोप्रा तिसऱ्या, आलिया भट्ट चौथ्या आणि दीपिका पदुकोण पाचव्या स्थानावर आहे. दर वर्षाच्‍या शेवटी, Yahoo सर्वाधिक सर्च करण्‍याच्‍या लोकांची यादी जाहीर करते.