मुंबई :  2021 मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आली आहेत. दरवर्षी प्रमाणे ( YAHOO )  याहुने 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या महिला सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. यात पहिले स्थान करीना कपूर खानने पटकावले आहे. त्याचबरोबर कतरिना कैफला लग्नामुळे या यादीत स्थान मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यादीत पहिले नाव बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचे आहे. अभिनेत्री तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.


https://filmfare.wwmindia.com/content/2021/jun/kareenakapoorkhan41623577218.jpg


कतरिना कैफ ही 2021 मधील दुसरी सर्वाधिक सर्च केलेली सेलिब्रिटी आहे. तिचे विकी कौशलसोबतचे लग्न तिला चर्चेत ठेवत आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.



 


आता जागतिक स्तरावर स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडे, तिने तिच्या सोशल मीडिया बायोमधून जोनास आडनाव काढून टाकले, ज्यामुळे ती खूप चर्चेत होती.



या यादीत आलिया भट्ट आता चौथ्या क्रमांकावर आहे. ही अभिनेत्री तिच्या बिग बजेट प्रोजेक्ट्स तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. तर दीपिका पदुकोण पाचव्या क्रमांकावर आहे. या वर्षी अभिनेत्रीचा अद्याप कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही पण ती लवकरच रणवीर सिंगसोबत '83'मध्ये दिसणार आहे.