Weight Loose At The Age of 40 : वयाच्या 40 शीत पोहोचल्यानंतर वजन कमी करणं खूप कठीण असतं असं अनेकांचं म्हणणं आहे. पण जर तुम्हाला देखील हे कठीण वाटत असेल तर बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावतचं तुम्ही उदाहरण घेऊ शकतात. त्याच्याकडून जाणून घ्या की त्यानं कोणत्या पद्धतीनं हे वजन कमी केलं आहे. खरंतर वयाच्या 40 शीनंतर वजन कमी करणं खूप कठीण होतं. तर थोडं वजन कमी करण्यासाठी देखील खूप वेळ लागतो. पण जर योग्य डायट असेल आणि लाइफस्टाइल असेल तर या वयात देखील तुम्ही नीट वजन कमी करु शकतात. तर अभिनेता जयदीप अहलावतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यानं त्याची वेट लॉस जर्नी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं 5 महिन्यात 26 किलो वजन कमी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयदीप अहलावतनं 'पाताल लोक' या वेब सीरिजमध्ये इन्स्पेक्टर हाथीरामच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेची सगळ्यांनी स्तुती देखील केली होती. त्यानं जवळपास दर महिन्याला जवळपास 5 किलो वजन कमी केलं. जयदीपसोबत तो त्याच्या ट्रेनरसोबत 3-4 वेळा वर्क आऊट करायचा. तर एक्सपर्टनुसार, जसं तुम्ही 40 शीत जाता तसे तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या दरम्यान, वजन कमी करणं हे खूप चॅलेन्जिंग असतं. अशात सगळ्यात महत्त्वाचं असते ती म्हणजे तुमची लाइफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल ही हेल्दी असणं आणि झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. 



ज्यांची झोप पूर्ण होतं नाही त्यांचं मेटाबॉलिजम कमी होतं. त्यामुळे त्यांचं वजन देखील पटपट वाढू लागतं. तणाव तुमच्या शरिरासाठी घातक आहे. त्यामुळे देखील तुमचं वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय तुम्ही शारिरीकदृष्ट्या अॅक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. व्यायाम करण्यासाठी वेळ नक्कीच काढा. वजन कमी करण्यासाठी वॉक, योगा, रनिंग, जॉगिंग, मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग रोज करू शकता. मद्यपान करू नका आणि चरबीयुक्त जेवणाचे सेवन करू नका.


हेही वाचा : Kolkata Rape Case : नव्या गाण्यामधून अरिजीतने पीडितेसाठी मागितला न्याय; एकदा ऐकाच!


दरम्यान, आता वजन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं रूटीन आणि डायट हे एकसारखं असेल हे शक्य नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचं शरिर हे वेगळं आहे.