Top Trending Google Most Searched People 2022 : हे वर्ष 2022 मध्ये अनेक गोष्टींसाठी गाजलं. राजकीय क्षेत्र पाहिलं तर सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा'(Bharat Jodo Yatra) गाजतं आहे. तर गुजरात (gujarat election result 2022) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh Election Result 2022) कोणाचं राज्य येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. महाराष्ट्रात सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) गाजला, पण सर्वसामान्य माणूस हा गुगलवर सर्वाधिक कोणाबद्दल (Google Most Searched) जाणून घेण्यात व्यस्त होता हे तुम्हाला माहिती आहे का? 


राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं  सर्वाधिक Search झाली. याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलवर नक्कीच गेल्या असाल. गुगल ट्रेंड (Google Trends) रिपोर्टनुसार सुष्मिता सेन, अंजली अरोरा आणि अब्दू रोजिक यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आले. अशा कुठल्या गोष्टी घडल्या की या व्यक्ती 2022 मध्ये प्रकाशझोतात आल्या. (Trending 2022 these common names became the most searched names on Google abdu rozik sushmita sen anjali arora amber heard and Rahul Gandhi Queen Elizabeth)


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! 'त्या' मॅडम तुम्हाला आठवतात का?


 


सुष्मिता सेन (Sushmita Sen)


आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी 14 जुलै 2022 ला सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला त्यानंतर एकच खळबळ उडाली. ललित मोदी यांनी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचा हा फोटो होता. त्यामुळे ललित मोदी आणि सुष्मिता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली. या पोस्टनंतर सुष्मिता प्रचंड ट्रोलही झाली. या बातम्या बऱ्याच दिवस चालल्या काही दिवसांनी पुन्हा एकदा या दोघांचे ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं. 




अंजली अरोरा (Anjali Arora)


आता पुढचं नाव आहे ते रातोरात इंटरनेटवर सेन्सेशन बनलेली अंजली अरोरा. इन्स्टावर तीने एक रील शेअर केलं आणि मग काय आजही गुगलवर तिच्याबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्य तुटून पडले होते. कच्छा बदाम गाण्यावर अंजलीने एक डान्स व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अंजलीची लोकप्रियता एवढी वाढली की तिला कंगना रानौत हिच्या लॉक अप या रिअॅलिटी शोसाठीही तिला विचारण्यात आले होते. अंजलीला आज कच्छा बदाम गर्ल या नावाने ओळखलं जातं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अब्दु रोजिक (Abdu Rojik)


गुगल सर्चवरील तिसरं नाव आहे. ताजिकिस्तानचा छोटा पाहुणा...ज्याने भारतीयांना वेड लावलं तो म्हणजे अब्दुल रोजिक. अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये तो सहभागी झाला आणि तो अचानक प्रकाशझोतात आला. 3 फूट उंचीचा हा अब्दूला 19 वर्षांचा आहे आणि तो ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. हाडांच्या आजारामुळे त्याची उंची कमीच राहिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एम्बर हर्ड (Amber Heard)


पुढचं नाव होतं ते हॉलिवूडमधील प्रसिद्ध एम्बर हर्ड जो Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तींच्या यादीत आहे. ज्यावेळी जॉनी डेपसोबत त्याचा घटस्फोट बातम्या समोर आल्या. लोकांनी त्याचाबद्दल जाणून घेण्यासाठी गुगलचा उपयोग केला. एम्बर हर्ड आणि जॉनी डेप यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं. या दोघांबद्दल जास्त जास्त जाणून घ्यायला लोक उत्सुक होते. अगदी घटस्फोटानंतर मिळणारी पोटगीबद्दलही गुगलवर सर्च करण्यात आलं. 




आता आम्हाला तुम्ही सांगा या लोकांशिवाय तुम्ही कोणाकोणाबद्दल गुगलवर जाणून घ्यायाचा प्रयत्न केला. शिवाय गुगलच्या या सर्वाधिक सर्च व्यक्तींमध्ये अजून कोणत्या नावाचा समावेश झाला पाहिजे ते...