Urfi Javed : आला वारा, गेला वारा, उडून गेला पदर.... सर्वांची तिच्यावरच नजर!
साडी नेसून विमानतळावर पोझ देत असताना आला वारा अन् उर्फीचा उडाला गोंधळ
Urfi Javed Viral Video : सोशल मीडिया सेन्सेशनल उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बोल्डनेससाठी ती काय करेल याची तुम्ही कल्पनाही करणार नाही. अशातच उर्फी जावेद शनिवारी मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी उर्फीने साडी नेसलेली होती, फोटोसाठी पोझ देत असताना वाऱ्याने तिच्या साडीचा पदर खाली पडला. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उर्फीने फिकट गुलाबी आणि केशरी रंगाची साडी नेसली होती. केशरी रंगाचा डीप नेक ब्लाउज परिधान केला होता. मुंबई विमानतळावरच्या प्रवेशद्वारापाशी ती जाते त्यावेळी पोझ देत असताना वाऱ्याने पदर पडतो. या साडीत उर्फीने इंन्स्टावर फोटोही शेअर केले आहेत.
व्हिडीओ पाहून स्पष्टपणे कळते की उर्फीला तिची साडी सांभाळण्यात खूप अडचण येत होती. जेव्हा उर्फीला तिची साडी सांभाळता येत नव्हती, तेव्हा तिच्यासोबत असलेल्या महिलेने तिला मदत केली. उर्फीचा हा लुक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. बोल्ड ब्लाउजमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान, उर्फीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना उर्फीला ट्रोल केलं आहे. काहींनी तिला सेफटी पिन द्या म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्यान, उर्फीने मुद्दाम साडीचा पदर पाडल्याचं म्हटलं आहे.