Dipika Chikhlia Romantic Video : रामानंद सागर यांचं 'रामायण' (Ramayana) प्रत्येक प्रेक्षकांच्या घराघरा पोहोचलं होतं.  यातील मालिकेतील राम, लक्ष्म, सीता, भरत हे पात्र करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक आजही देव मानतात. ते कुठेही दिसले तरी त्यांचा समोर नतमस्तक होतात. या मालिकेतील रामाचं पात्र करणार अभिनेते अरूण गोविल (Actor Arun Govil) यांना अनेक वेळा लोकांना सांगावं लागतं. ते एक पात्र होतं मी देव नाही. ते एकदा विमानतळावर असताना एक महिला राम राम म्हणतं त्यांचा चरणावर नतमस्तक झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला होता. याच मालिकेत सीतेचं पात्र करणारी अभिनेत्री दीपिका (Dipika Chikhlia) या सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांचा पतीसोबत रोमँटिक क्षण (Romantic Video) पाहून नेटकरी संतापले आहेत. 


नवऱ्यासोबत रोमँटिक क्षण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका यांनी त्यांचा इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा आयुष्यातील खासगी क्षण शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. दीपिका या त्याचे पती हेमंत टोपावालासोबतचा रोमँटिक व्हिडीओ पाहिला मिळतो. हा व्हिडीओ आजचा नसून थ्रोबॅक हॉलिडे व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका क्रॉप टॉपसोबत क्रिम कलरची बूटी पँट घातलेल्या दिसतं आहेत. शिवाय काळ्या रंगाचा प्रिंटेड श्रग कॅरी केला होता. 



नेटकरी संतापले


दीपिका चिखलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 





तर काही यूजर्सने चांगल्या कंमेट्स केल्या आहेत.  एका यूजरने लिहिले की, 'तू तुझ्या पतीसोबत खूप छान दिसतेस.' एकाने लिहिले की, 'नेहमी अशीच हसत राहा.'