VIDEO : लग्नानंतर राखीनं बदलला धर्म? हिजाब घालून...हे करतेय तरी काय
Rakhi Sawant Marriage : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत हिने धर्म बदला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तिचा केशरी रंगाचा हिजाब घालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rakhi Sawant Wears Hijab Video : एंटरटेनमेंट क्वीन, बीग बॉसची (Big Boss) माजी स्पर्धक आणि अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा आयुष्यात अनेक वादळ सुरु आहे. आईच्या आजारपणामुळे राखी पहिलेच त्रस्त असताना. प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आदिलकडून लग्नाचं खंडन...या सगळ्यांनंतर राखीच्या आयुष्य अनेक वादळांनी घेरलेलं आहे. लव्ह लाईफपासून (love life) बोल्ड स्टेटमेंटमुळे (bold statement) राखी कायम चर्चेत असते. आता राखीचा (rakhi Video) नवा व्हिडीओने नवीन वादाला तोंड फोडलं आहे. केशरी रंगाच्या हिजाब (hijab) घालून राखीला नेमकं काय सांगायचं आहे.
हिजाब घालून...
राखी सावंतने तिचा एक नवीन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) शेअर केला आहे. यामध्ये ती हिजाब परिधान केला आहे. केशरी रंगाचा हिजाब घालून पुढच्या क्षणाला आदिल दुर्रानीसोबत मस्ती करताना दिसत आहे. आदिलसोबत लग्नानंतर राखीने धर्म बदलला का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या लग्नासाठी फातिमा असं नाव ठेवलं होतं, असं विवाह प्रमाणपत्राद्वारे उघड झालं आहे.
मुंबईत रडताना दिसली
राखी सावंत शनिवारी संध्याकाळी पापाराझींचा (Paparazzi) सामना करावा लागला. त्यावेळी राखी ढसाढसा रडताना दिसली. पापाराझींशी बोलताना राखी लग्नाबद्दल आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी राखी म्हणाली 'माझ्या आईला अजून माहिती नाही. माझ्या मावशी आणि मामाला याबद्दल कळलं. आई शुद्धीत आली आणि ही बातमी तिने ऐकली तर तिच्यावर काय परिणाम होईल. या चिंतेने राखी खचली होती. माझ्या नशिबात एवढं दु:ख का आहे?', असा प्रश्नही तिने यावेळी विचारला. (Trending Video Rakhi Sawant Wears Hijab Video and Love Jihad Rakhi Sawant Adil Khan Durrani Marriage Viral on Social media)
लव्ह जिहादवर बोलली होती राखी
राखीने लव्ह जिहादवर (Love Jihad) आपलं मत मांडलं होतं. त्यात ती म्हणाली होती की, 'मला याबद्दल बोलायला आवडणार नाही. आदिलने जर माझा स्वीकार केला नाही तर हे लव्ह जिहादचं होणार. जर त्याने मला स्वीकारलं तर हे लव्ह मॅरेज (Love marriage) होणार. '