Tripti Dimri Movies: एका चित्रपटाने या अभिनेत्रीचे नशीबच फळबळले आहे. नॅशनल क्रश ठरलेल्या अभनित्रीला आता बॅक टू बॅक चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. इतकंच नव्हे तर लग्नासाठीही तिला विचारण्यात आलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमल चित्रपटानंतर तृप्तीने यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. अलीकडेच तिने लग्नासंदर्भात एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने म्हटलं आहे की, करिअर सांभाळत असताना आजूबाजूचे लोक कशा पद्धतीने  निगेटिव्ह कमेंट करायचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृप्ती डिमरीमे अलीकडेच कतरिना कैफच्या एका ब्रँडसाठी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, माझं मुळ गाव उत्तराखंड आहे. मात्र, मी दिल्लीत मोठी झाली आहे. जेव्हा मी मुंबईत स्थायिक झाले तेव्हा माझ्यासाठी सर्वच खूप कठिण होतं. समाजातील लोक आणि माझे नातेवाईकही माझ्या पालकांना टोमणे मारायचे. तुमच्या मुलीला कोणत्या क्षेत्रात पाठवताय? ती बिघडेल. ती चुकीच्या लोकांसोबत राहण्यास सुरूवात करेल. स्वतःसाठीही चुकीचे निर्णय घेईल, कोणीच तिच्यासोबत लग्न करणार नाही, असं लोक म्हणायचे.


एक वेळ अशीही आली होती की मी स्वतः कन्फ्यूज झाली होती. कारण जेव्हा तुमच्याकडे काम नसतं तेव्हा तुम्ही सगळ्या आशा सोडून देता. मात्र मला एक गोष्ट माहिती होती की मी माझ्या पालकांकडे परत जाऊ शकत नाही, असंही तृप्तीने म्हटलं आहे. तृप्तीने पुढे हे देखील सांगितले की, तिचा पहिला चित्रपट लैला मजनू पाहून तिचे पालक खूप खुश झाले होते. 



काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात तृप्तीला विचारण्यात आलं होतं की, तिला नॅशनल क्रश म्हटलं जातं यावरुन तुला काही अडचण आहे का? त्यावर तिने म्हटलं होतं की, यासाठी मला देवाला धन्यवाद द्यायचे आहेत. लोकांना माझं काम आवडतंय आणि ते त्याबद्दल बोलतायत. सुरुवातीला जेव्हा मी या क्षेत्रात आली होती तेव्हा मला नेहमी वाटायचे की लोकांनी इतर गोष्टींवर चर्चा करण्याव्यतिरिक्त माझ्या कामाविषयी बोलावं. माझा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांनी माझ्या कामाबाबत चर्चा केली. मला वाटतं की प्रत्येक अभिनेत्याला हीच गोष्ट अधिक प्रोत्साहित करते. 


तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अॅनिमलनंतर ती विकी कौशलसोबत बॅड न्यूजमध्ये दिसली होती. त्यानंतर राजकुमार रावसोबतचा विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर धडक 2 आणि भुल भुलैया 3 या चित्रपटातदेखील ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पूर्वी एका चित्रपटासाठी 40 लाखांचं मानधन घेणेरी तृप्ती आज  एका चित्रपटासाठी 10 कोटी इतकं मानधन घेते.