न्यूड सीनच्या आधी रणबीरने तृप्ती डिमरीला विचारला होता हा प्रश्न; अभिनेत्री म्हणते...
Triptii Dimri in Animal: रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीरबरोबरच अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या बोल्ड सीनचेही कौतुक होत आहे.
Triptii Dimri in Animal: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अॅनिमल चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली. या चित्रपटातील रणबीर आणि रश्मिकाच्या अभिनयाबरोबरच आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. ती म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी. अॅनिमलच्या रिलीजनंतर तृप्ती डिमरची खूप लोकप्रिय झाली. 2023मध्ये गुगलपासून ते इन्स्टाग्रामपर्यंत तृप्तीला सर्च करण्यात आले. अॅनिमलमध्ये तृप्तीची भूमिका जरी लहान असली तरी तिचा अभिनय आणि तिने दिलेल्या बोल्ड सीनमुळं सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. तृप्तीने रणबीरसोबत दिलेल्या बोल्ड सीनमुळं तिचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सदेखील वाढले आहेत. त्याचदरम्यान एका मुलाखतीदरम्यान तृप्तीने चित्रपटातील तिच्या आणि रणबीरच्या केमिस्ट्रीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रपटातील भूमिकेमुळं तृप्ती डिमरी सध्या भारताची नॅशनल क्रश बनली आहे तर सोशल मीडियावरही तिला भाभी-2 म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर खासकरुन रणबीर कपूर आणि तृप्ती यांचे चित्रपटातील इंटिमेट सीनची चांगलीच चर्चा आहे. याबाबतच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सविस्तर भाष्य केले आहे. रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन देताना दडपण होतं का? रणबीर सोबत सेटवर नातं कसं होतं? याबाबत तिने सविस्तर उत्तरे दिली आहेत.
तृप्तीला सुरुवातीला रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारला असता, तिने हसत हसत उत्तर दिलं आहे. मी जेव्हा त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केले तेव्हा सुरुवातीला तो आजूबाजूला असताना माझ्यावर सतत दडपण असायचा. मी पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याला इतकंच सांगितलं की तु माझा आवडता अभिनेता आहेस, असं तृप्तीने उत्तर दिलं होतं.
तृप्तीने रणबीर कपूर खूप चांगला को-स्टार असून त्याने खूप मदत केली असं म्हणत त्याचे कौतुक केलं आहे. चित्रपटातील गाणं 'पहले भी मै' या गाण्यातील इंटिमेट सीनच्या चित्रीकरणादरम्यान रणबीर खूप शांत होता. त्याचा स्वभाव आवडला असल्याचेही तृप्तीने म्हटलं आहे. तिने पुढं म्हटलं आहे की, जेव्हा तुमचा सहकलाकार तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमची खूप काळजी घेतो तेव्हा सहाजिकच तुम्हाला काम करण्यास खूप मदत होते. ते सीन्स करण्यास खूप सहजता येते.
तृप्तीने पुढे म्हटलं की, इंटिमेट सीन शूट करत असताना रणबीरने मला तू कंफर्टेबल आहेस का असा प्रश्न केला होता. तर, संदीप सर, रणबीर आणि डीओपी यांनी मला सांगितले की, जेव्हा पण तुम्हाला दडपण येईल किंवा अनकंफर्टेबल वाटेल तेव्हा फक्त आम्हाला सांगा. तू कंफर्टेबल होशील असा आम्ही प्रयत्न करु.
तृप्ती म्हणते की, तुम्ही अशा वातावरणात आहात जिथे लोक तुमचा एक व्यक्ती म्हणून आदर करतात. तुमच्या आवडीनिवडींची काळजी घ्या. तुम्ही काय करता, त्या विशिष्ट क्षणी तुम्हाला कसे वाटते याचा आदर करतात हे खूप महत्त्वाचे आहे.