मुंबई : बॉलिवूड सेलेब्रिटी सोशल मीडियावर नेहमी नवनवीन पोस्टर पोस्ट करत असतात. त्या पोस्टरमुळे सेलेब्रिटी नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल होतात. सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या जाळ्यात अभिनेता अभिषेक बच्चन अडकला आहे. अभिषेकने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवर एक प्रेरणादायी फोटो पोस्ट केला होता. तर कमेंटमध्ये एका नेटकऱ्याने त्याला 'बेरोजगार' म्हटलं आहे. त्याच्या कमेंटला अभिषेकने मजेदार उत्तर दिलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सोमवारी आनंदी असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणता?, 'बेरोजगार' या कमेंटचे उत्तर देताना अभिषेक म्हणाला की, 'मी तुमच्या मताशी सहमत नाही, कोणालाही आपण करत असलेलं काम आवडतं.' असं मजेदार उत्तर त्याने युजरला दिलं आहे. 



तर अभिषेकच्या या पोस्टचं काहींनी कौतुक देखील केलं आहे. तर काहींनी तू पून्हा रूपेरी पडद्यावर कधी झळकणार असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. आम्ही तुला पुन्हा अभिनय करताना पाहण्यासाठी आतुर आहोत. तर आता अभिषेक कधी भूमिका साकारण्यासाठी सज्ज होईल हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


अभिषेक 'मनमर्जिया' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात त्याच्या शिवाय अभिनेता  विकी कौशल आणि अभिनेत्री तापसी पन्नू देखील झळकली होती.