अभिनेता आणि अभिनेत्री सतत एकत्र असताना त्यांच्यात प्रेमसंबंधांविषयी...; Shilpa Tulaskar चं मोठं वक्तव्य
Shilpa Tulaskar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. मालिकेत स्वप्निल सौरभ ही भूमिका तर शिल्पा ही अनामिका भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की सौरभ आणि अनामिका यांच्या नात्यात अंतर आलं आहे. अनामिकाचा पती अशोक समर्थनं मालिकेत एन्ट्री केल्यानंतर संपूर्ण कथेनं वळण घेतलं होतं. आता पुन्हा एकदा सौरभ आणि अनामिका एकत्र एकत्र आले आहेत. त्यांचा एक इंटीमेट सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याविषयी शिल्पानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
पाहा काय म्हणाली शिल्पा -
शिल्पानं नुकतीच अमृता फिल्म्सला मुलाखत दिली होती. यावेळी शूटिंगच्या वेळी एखादा अभिनेता आणि अभिनेत्री सतत एकत्र असताना प्रेमात पडणं असं कधी घडलं आहे का? असा प्रश्न विचारता शिल्पा म्हणाली, 'स्वप्निल जोशीबाबतच मी सांगते. स्वप्निलबरोबरच माझं खूप छान व इंटिमेट सीन असतात. छान म्हणतेय कारण खूप सुंदररित्या ते चित्रीत केले जातात. इथे माझ्या सहकलाकारांना त्याचं श्रेय द्यायला हवं. स्त्रीला स्पर्शामधूनच कळतं की इथे काय गडबड आहे,'
पुढे शिल्पा म्हणाली, 'जर सीन करताना माझ्या सहकलाकार काहीही वाटलं असेल तर ते त्याने माझ्या पर्यंत पोहचू दिलं नाही. हे खूप कठीण काम आहे. जसं मी काम करते तसं काम माझा सहकलाकारही करतो. त्याचबरोबर आपण सुशिक्षित व समजुतदार आहोत. त्या पद्धतीनेच काम करत असतो. जर आपण आपल्यालाच मर्यादा घातल्या नाहीत तर प्रत्येक सेटवर तुम्हाला प्रेम होणार आणि मग तुमचा प्रेमभंग होईल.' (Tu Tevha Tashi Actress Shilpa Tulaskar Talk About Intimate Scene With Swapnil Joshi)
हेही वाचा : 'तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला...', घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'हे' काय बोलून गेली Mansi Naik
याविषयी सांगताना शिल्पा पुढे म्हणाली, 'स्वप्निल व मी एक सीन करत होतो. जिथे आमच्या दोघांचं एकमेकांच्या डोक्याला डोकं व नाकाला नाक टेकतं. आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर आहे. आमच्या समोर तिसरा माणूस बसला आहे जो आमच्या दोघांच्या श्वासाच्या अंतरावर आहे. हा सीन चित्रित करत असताना मध्येच स्वप्निल म्हणाला, ऐकना मला असं वाटतं की आपल्या तिघांचं अफेअर आहे. अशाप्रकारचे सीन चित्रीत करणं दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. सेटवर कोणाबरोबर तरी अफेअर होणं हे सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही.'