मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' एका रोमांचक वळणावर आहे. मालिका पुढे 5 वर्षे गेली असून मालिकेतील अनेक पात्रांनी निरोप घेतला आहे. असं असलं तरीही मालिकेत तिखट-गोड प्रसंग हे आहेतच. मालिकेतील 'राजलक्ष्मी' आणि 'युवराज' हे दोन्ही बालकलाकार सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजलक्ष्मी आपल्या गोड स्वभावाने तर युवराज आपल्या तिखट स्वभावाने सगळ्यांचच लक्ष वेधत आहे. सुखाची झुळूक तेव्हाच कळते जेव्हा एखाद्याने दुःखाची झळ भोगलेली असते. असंच काहीस या कलाकारांमध्ये आहे.


 


युवराजच्या उद्धट आणि रागीष्ट स्वभावामुळे राजक्ष्मीचा गोंडस आणि निरागस स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीला येत आहे. युवराज ही भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस मोहिते नंदिताची जागा पुरेपुर भरून काढत आहे. नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या श्रेयसचं भरभरून कौतुक होत आहे. असं असताना श्रेयसने अभिनयाचे धडे हे आपल्या वडिलांकडूनच घेतले आहे.  


'युवराज' हा बालकलाकार मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. ज्याने अनेक नाटकांमधून, सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.



युवराज म्हणजेच श्रेयसच्या वडिलांचे नाव आहे संजय मोहिते. अभिनेता संजय मोहिते यांना प्रेक्षकांनी अनेक सिनेमा, नाटकांतून पाहिले आहे.


 



एवढंच नव्हे तर 'फॉरेनची पाटलीन', 'वन रूम किचन', 'कर्तबगार', 'ऑन ड्युटी चोवीस तास', 'नातवंड' यांसारख्या सिनेमात त्यांनी काम केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचा मुलगा श्रेयस मोहिते सुद्धा कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. श्रेयसने 'फिनिक्स ऍक्टिंग स्कुल' मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' ही त्याची पहिलीच मालिका आहे. मात्र त्याचा अभिनयाच हा अतिशय दाणका असून त्याचं भरभरून कौतुक होत आहे.