मुंबई : 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातर म्हणजे ईशा सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ती वधूच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे गायत्री लग्न करत आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. खुद्द गायत्रीने वधू रूपातील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.  या फोटोमध्ये ती एखाद्या नवरी प्रमाणे अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या सुंदर फोटोंमुळे ती लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्याचप्रमाणे ती कोणासोबत लग्न करणार आहे? तिचा लग्नसोहळा कुठे पार पडणार? लग्नात कोण-कोण उपस्थित राहणार अशा चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत. 



'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले होते. अभिनेता सुबोध भावेसोबत गायत्रीने साकारलेली ईशाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर दुसरीकडे सध्या व्हायरल होत असलेले तिचे फोटो तिच्या लग्नातील नाहीत. 


एका कपड्याच्या ब्रँडसाठी तिने फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटचे हे फोटो आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती फार उत्साही आणि आनंदी दिसत आहे.