नाईकांच्या वाड्यात नव्या सुसल्याची एन्ट्री, कोण आहे ही नवी सुशल्या
रात्रीस खेळ चाले३ मालिकेत सुसल्याची भूमिका पौर्णिमा डे पार पाडतेय
मुंबई : 'अण्णा नाईक परत येणार'... हे वाक्य अख्या माहाराष्ट्रात चर्चेत होतं...'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेम मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेच्या तिसऱ्या भागाला उत्सुकता दाखवली होती.. नुकतीच 'रात्रीस खेळ चाले ३' ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु झाली आहे.
आता या मालिकेत नवनीन ट्विस्ट येणार असल्याने या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळते... या मालिकेत अण्णा नाईक आणि शेवंता भूताच्या भूमिकेत आहेत... तर माई या मालिकेत थकलेली अस्ताव्यस्त अवस्थेत दिसत आहे.. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो आऊट झाला... या प्रोमोत नाईकांचा वाडा अस्ताव्यस्त अवस्थेत दिसत आहे तर सुसल्या माईकडून जबरस्तीने प्रॉपर्टी पेपरवर अंगठा घेण्याचा प्रयत्न करते..मात्र तेवढ्यात अभिराम येतो.
या प्रोमो नंतर सुसल्याची भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याआधी हि भूमिका... ऋतुजा धर्माधिकारीने या नवोदित कालाकाराने चोख पार पाडली होती.सुसल्याच्या भूमिकेतील नखरा तिने अचूक पकडला होता. यानंतर या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात सुसल्याचं बालपण दाखवण्यात आलं होतं. या दोन्ही भूमिकांनी चाहत्यांच्या मनावर जादू केली होती
या नंतर या मालिकेच्या ३ पर्वात ही भूमिका कोण पार पाडणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होत... रात्रीस खेळ चाले३ मालिकेत सुसल्याची भूमिका पौर्णिमा डे पार पाडतेय. सुसल्याचा नखरा पेलण्याचं आव्हान आहे. प्रोमो आऊट झाल्यानंतर सुसल्याची झलक पाहयला मिळाली. गावातील एका साध्याभोळ्या इसमाला ती आपल्या जाळ्यात ओढताना दिसली. सुसल्याचं लग्नही झालं आहे. तिचा नवरा सयाजीराव हा निलंबित पोलीस दाखवला आहे. भोळ्या भाबड्या माणसांना भुलवून, धमकावून त्यांच्याकडे पैसे-दागिने लुटण्याचा सुसल्या आणि सयाजीचा डाव दिसत आहे
नवीन सुसल्या आहे तरी कोण?
रात्रीस खेळ चाले३ मालिकेत सुसल्याची भूमिका पौर्णिमा डे पार पाडतेय. पूर्णिमाने आयुर्वेदीक डॉक्टरकीचे म्हणजेच बी.ए.एम.एसचे शिक्षण घेतले आहे. खऱ्या आयुष्यात पुर्णिमा अभिनेत्री होण्याची इच्छा असल्यामुळेच डॉक्टर न होता तिने कलाक्षेत्राची वाट निवडली. याआधी पुर्णिमा गर्ल्स हॉस्टेल, तुला पाहते रे या मालिकेत दिसली होती. यामुळे तिचे चाहते तिला सुसल्याच्या भूमिकेत पहायला उत्सुक आहेत.