COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आता वेगळं वळण घेत आहे. पाठकबाई आणि सखी एकत्र येऊन राणाच्या इंटरनॅशनल कुस्तीची तयारी करतात. पण या  सगळ्यात राणा आणि सखीमध्ये आता जवळीक वाढताना दिसत आहे. याचा फटका राणा आणि अंजलीच्या नात्याला बसेल का? असा प्रश्न आता उभा आहे. त्यात नंदिता राणा आणि अंजलीच्या नात्यात अजून अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सखी आणि अंजलीला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी राणा मनापासून प्रयत्न करतो. राणा हे सगळं मनाासून करत असल्याचं पाहून अंजली खूप खूष होते. पण सगळं सुरक्षित सुरू असताना यामध्ये नंदिनी म्हणते तसं काही घडलं तर...


राणा आता आपल्या इंटरनॅशनल कुस्तीची तयारी मनापासून करत आहे. हे सगळं पाहून अंजली आणि घरातले सगळे समाधानी होतात. सखी आणि राणाचे कोच राणाच्या तयारीकडे लक्ष देत आहेत.