मुंबई : राणा दा चा चालतंय ना व्ह, चालतंय की हा संवाद आज संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतो आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आणि कोल्हापूरच्या मातीत रंगलेली "तुझ्यात जीव रंगला" हि मालिका,  या मालिकेने नुकतेच आपले ६०० भाग पूर्ण केले. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेने आपले ६०० भाग पूर्ण केले आहेत. पण या ६०० भागांचे सेलेब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंड ला देऊ केले आहेत. झी मराठीवरील मालिका कायमच सामाजिक बांधिलकी जपत असतात. असाच एक प्रयत्न यातून केला आहे. 


केरळात पावसाने जे आपलं रूद्र रूप दाखवलं त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं. पाऊस आता थांबला असला तरीही तेथील नागरिकांच जीवन सुरळीत करण्यासाठी मदतीची गरज आहे. ही मदत ओळखूनच तुझ्यात जीव रंगलाच्या टीमने हा निर्णय घेतला आहे.