Charu Asopa On Rajeev Sen : टीव्ही अभिनेत्री चारु आसोपा (Charu Asopa) ने 2019 मध्ये पूर्व मिस यूनिवर्स सुष्मिता सेन  (Sushmita Sen)चा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) सोबत लग्न केलं. लग्नानंतर या दोघांमध्ये खटके उडू लागले. गेल्या महिन्यात त्यांचं नात तुटण्यापर्यंत गेलं होतं. मध्यंतरी गणेश चर्तुर्थीच्या दरम्यान त्यांनी आपल्या लग्नाला एक चान्स दिला होता. आता पुन्हा या दोघांचं नात बिनसलं आहे. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये तणावाचं वातावरण आहे. चारुने राजीववर गंभिर आरोप केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारुने राजीववर लावले धोखा देण्याचे आरोप
चारु आसोपाने राजीव सेनवर धोका दिल्याचा आरोप लावला आहे. तिने सांगितलं की, राजीव जिमच्या नावाखाली पुर्णदिवस घराबाहेर रहायचा आणि त्याच्या अनुपस्थितीत घराचे दरावाजे तो बंद करुन जायचा. दिलेल्या एका मुलाखतीत चारुने सांगितलं की, 'माझ्या प्रेग्नंसीच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये मी बिकानेरमध्ये होती आणि मी कुठेही जायचे तेव्हा माझ्या मागे घरातले कॅमेरा बंद करायचे. 


जेव्हा मी त्यांना असं करण्यामागचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, तु बग बॉससारखी घरात जासूसी करु ईच्छितेस.  ही एक छोटी गोष्ट होती ज्याकडे मी फारसं लक्ष दिलं नाही. जिमच्या नावाखाली ते दिवसभर घराबाहेर असायचे.''


प्रेग्नेंसीमध्येही राजीव नव्हता चारुसोबत
चारूने मुलाखतीत सांगितलं की, चारू असोपाच्या गरोदरपणाच्या ८व्या महिन्यातही राजीव तिच्यासोबत नव्हता. अभिनेत्री म्हणाली, "जेव्हा मी आठ महिन्यांची गरोदर होते, तेव्हा त्याने मला कधीच विचारलं नाही की, मला कसं वाटतं. त्याऐवजी, तो टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंगला जिममध्ये भेटण्याची फुशारकी मारायचा. माझा दिवस कसा गेला हे त्याने मला कधीच विचारलं नाही. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला हजारो गोष्टींमधून जावं लागतं. तिचा मूड खराब होईल आणि तो पुन्हा घर सोडून जाईल या विचाराने मी काहीच बोलले नाही."