मुंबई : ‘शक्ति अस्तिव के अहसास की' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काम्या प्रियकर शलभ डांगसह लग्नबंधनात अडकणार आहे. शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. १० फेब्रुवारी रोजी हे प्रेमीयुगूल लग्न करणार आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नघाई दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. पत्रिकेचा बूमेरँग तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पत्रिकेचा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' असे लिहिले आहे. सोबतच #ShubhMangalKaShaचा देखील वापर केला. 



काम्या पंजाबी (Kamya Punjabi) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत असल्यामुळे काम्या तिच्या आरोग्यासंबंधी काही समस्यांबद्दल शलभला भेटली होती. त्याच दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. 


काम्या आणि शलभ एकमेकांना भेटल्यानंतर एका महिन्यातच शलभने काम्याला प्रपोज केले होते. एका मुलाखती दरम्यान पुन्हा एकदा लग्न करणाचा निर्णय घेणं माझ्यासाठी सोप्पं नसल्याचं तिने म्हटलं. 


काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे. तर शलभला ईशान हा १० वर्षांचा मुलगा आहे. याआधी काम्याचा विवाह बंटी नेगी या व्यावसायिकाशी झाला होता. परंतु २०१३ मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले.