TV Actress : Plastic Surgery नंतर `या` अभिनेत्री कशा दिसतात पाहिलं?
TV actress : आणखी किती सुंदर होणार? ग्लॅमरस दिसण्यासाठी `या` 7 टीव्ही अभिनेत्रींनी केली Plastic Surgery
TV Actress Plastic Surgery Look : कलाक्षेत्रात अभिनेत्री आपला लूक बदलण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करत असतो. अनेकदा अभिनेत्री सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. प्लॅस्टिक सर्जरी लूक बदलण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनेत्रींचे सुदंर दिसणे खूप आवश्यक मानले जाते. त्यामुळे काही अभिनेत्री आपले सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करुन घेतात. टीव्हीवरील अनेक नावाजलेल्या चेहऱ्यांनी प्लॅस्टिक सर्जरीही केली आहे आणि आता ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसत आहेत आणि त्यांच्यातील बदल सगळ्यांच्या लक्षात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती टीव्ही अभिनेत्री आहे जिने प्लास्टिक सर्जरी करून तिचा लूक बदलला आहे. (TV actress Have you seen how these actresses look after plastic surgery Mouni Roy Gauahar Khan nz)
मौनी रॉय (Mouni Roy)
टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'नागिन' हिने तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली आणि या शस्त्रक्रियेनंतर ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली आहे. मौनीला तिचे ओठ आवडत नव्हते, म्हणून तिने ओठांची शस्त्रक्रिया करून तिचा लूक बदलला.
रश्मी देसाई (Rashami Desai)
टीव्हीवरील आणखी एक प्रसिद्ध चेहरा आणि 'उतरन' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रश्मी देसाई हिने कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. रश्मीने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. रश्मीच्या या नव्या लूकमध्ये ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे.
सारा खान (Sara Khan)
टीव्ही अभिनेत्री सारा खानने तिच्या नाक, डोळे आणि गालांवर शस्त्रक्रिया केली आहे. हे सत्य सारा खानने कधीच स्वीकारले नसले तरी नीट पाहिले तर साराच्या लूकमध्ये पूर्वीच्या तुलनेत बरेच बदल झाले आहेत.
गौहर खान (Gauahar Khan)
गौहर खानने तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली असून या शस्त्रक्रियेची बरीच चर्चा झाली होती. गौहरने स्वत: एका मुलाखतीत तिच्या खराब ओठांच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले.
आश्का गरोडिया (Aashka Goradia)
आशकाला टीव्ही इंडस्ट्रीत जवळपास 16 वर्षे झाली आहेत आणि तिचा असा विश्वास आहे की ती नेहमीच सारखी दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत तिला तिचे ओठ मोठे हवे होते, म्हणून तिने प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने तिचे ओठ मोठे केले.
शमा सिकंदर (Shama Sikander)
ये मेरी लाइफ है या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर हिनेही सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केली आहे, मात्र शमा सिकंदरनेही तिची शस्त्रक्रिया कधीच स्वीकारलेली नाही. पण तिला आधी आणि आताचे लूक पाहून हे स्पष्टपणे समजू शकते की तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे, तिचा लुक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे.
मॉली गांगुली (Mouli Ganguly)
टीव्ही अभिनेत्री मौली गांगुलीनेही तिच्या ओठांची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. मॉलीने तिच्या ओठांवर, नाकावर आणि गालांवर शस्त्रक्रियाही केली आहे, पण मॉलीने तिच्या शस्त्रक्रियेची वस्तुस्थिती कधीच मान्य केली नाही.