TV Actress Turned Down Love Sex Aur Dhokha 2 Role: 'छोटी सरदारणी' या टीव्ही मालिकेमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री नम्रीत कौर आहलुवालिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आहे. 'लव्ह सेक्स और धोका 2' या चित्रपटामधून नम्रीत पदार्पण करेल असं सांगितलं जात आहे. मात्र आता दिबाकर बॅनर्जींच्या या चित्रपटामध्ये अश्लील सीन्स असल्याने अभिनेत्रीने भूमिकेला नकार दिल्याचं वृत्त आहे. 2010 सालातील 'लव्ह सेक्स और धोका' चित्रपटाचा पुढील भाग असलेल्या या चित्रपटामध्ये नसरुत भरुचा आणि अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत आहेत.


नेमकी या माहिती समोर आली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लव्ह सेक्स और धोका 2' या चित्रपटाची स्क्रीप्ट नम्रीतने वाचली आहे. मात्र चित्रपटाचं कथानक पुढे सरकतं त्याप्रमाणे चित्रपट अधिक बोल्ड होत जातो. हे बोल्ड सीन नम्रीतला योग्य वाटले नाहीत. आयएएनएस या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "नम्रीत कौरने तिची 'लव्ह सेक्स और धोका 2' या चित्रपटातील भूमिका सोडली आहे. या चित्रपटामध्ये फार बोल्ड सीन असल्याने तिने चित्रपट सोडला आहे. एकता कपूर बिग बॉस या शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती त्यावेळेस तिने नम्रीतबरोबर या चित्रपटासाठी बोलणी करुन करार केलेला. बॉलिवूडमधील पदार्पणाच्या चित्रपटामध्येच नम्रीतला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या द्वारे मिळाली होती," असं सांगितलं.


हे जमणार नाही


"चित्रपटातील कथानकामध्ये अधिक बोल्ड सिन्सची मागणी होती. मात्र एवढे इंटिमेट सीन्स करण्यासाठी नम्रीत कन्फर्टेबल नव्हती. आपल्याला हे जमणार नाही, असं म्हणत तिने भूमिका नाकारली," असं सूत्रांनी स्पष्ट केलं.


2010 चा चित्रपट ठरला हीट


'लव्ह सेक्स और धोका 2' चित्रपटाचं पोस्टर निर्मात्यांनी प्रदर्शित केलं आहे. निऑन रंगातील या कव्हरवरुन ही कथा नव्या युगातील डिजीटलाइज लव्ह स्टोरी असल्याचे संकेत मिळत आहेत. या चित्रपटाचा पाहिला भाग 2010 साली चांगला गाजला होता. कथा सांगण्याची पद्धत फारच निराळी होती आणि प्रायोगिक सिनेमामधील हा प्रयत्न कमर्शिएलीही यशस्वी ठऱलेला. त्यामुळेच आता दुसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. 'लव्ह सेक्स और धोका 2'ची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्सची आहे. हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल असं सांगितलं जात आहे.


चर्चांना उधाण


'लव्ह सेक्स और धोका'च्या दुसऱ्या भागातील अभिनेत्रीनेच बोल्ड दुष्यांमुळे नकार दिल्याने आता हा चित्रपट खरोखरच इतका बोल्ड आहे का? याची कथा काय आहे याबद्दलची चाहत्यांमधील उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. नम्रीत स्वत: सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मात्र तिलाही स्क्रीप्ट बोल्ड वाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.