धक्कादायक ! आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्री हादरली
प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वीजे चित्रा फक्त २८ वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन जीवन संपवलं. तिचा काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील बिझनेसमॅन हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. सध्या हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
चेन्नई : प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वीजे चित्रा फक्त २८ वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन जीवन संपवलं. तिचा काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील बिझनेसमॅन हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. सध्या हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
चित्राने डिप्रेशनमुळे हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. चित्राही एका मालिकेमध्ये काम करत होती. ईवीपी फिल्म सिटीमधून शूटिंगनंतर ती रात्री 2:30 वाजता हॉटेलमध्ये आली. ती हेमंत सोबतच राहत होती. 'घरी आल्यावर चित्राने ती अंघोळीसाठी जात असल्याचं सांगितलं. पण ती बराच वेळ बाहेर आली नाही. मी तिला आवाज दिला पण कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर हॉटेलच्या स्टाफला याबाबत माहिती दिली. जेव्हा ड्युबलिकेट चावीने दार उघडलं गेलं तेव्हा ती सिलींगला लटकलेल्या अवस्थेत दिसली.' अशी माहिती हेमंत रवी यांनी दिली आहे.
अभिनेत्री चित्राच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण कलाकारांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे.