मुंबई : ‘तू आशिकी’ या मालिकेतील अभिनेत्री जन्नत जुबिर रहमानीने मालिकेतील सह अभिनेता रित्विक अरोराला Kiss करण्यास मनाई केल्याने चर्चेत आली होती. 


‘किस’चा किस्सा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत पंक्ति ही भूमिका साकारणारी जन्नत आणि अहानची भूमिका करत असलेल्या रित्विकमध्ये एक लव्ह सीन शूट करायचा होता. पण जन्नतच्या आईला हे पसंत नव्हतं. आपल्या मुलीने ऑनस्क्रीन किस करू नये असं तिचं म्हणनं होतं. पण आता जन्नतच्या आईला हा तिचा विरोध महागात पडू शकतो, अशी चर्चा आहे. 


हॅली शाहची ऑडिशन


‘तू आशिकी’ या मालिकेचा निर्माता जन्नत करत असलेल्या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री शोधत असल्याचं बोललं जात आहे. स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आत्तापर्यंत तीन अभिनेत्रींचं ऑडिशन जन्नतच्या भूमिकेसाठी घेतलं गेलं आहे. सर्वातआधी यासाठी अभिनेत्री हॅली शाह हिला फोन करण्यात आला. कलर्स चॅनेलचीच मालिका 'शक्ति: अस्तित्व के एहसास' मध्ये दिसणा-या हॅली शाहच्या जवळच्या मित्राने स्पॉटबॉयला सांगितले की, ‘हो, हॅलीला शो ‘तू आशिकी’मध्ये जन्नतच्या जागेवर रिप्लेस करण्यासाठी अप्रोच करण्यात आलंय. पण अजून तिने होकार कळवला नाहीये’.



आणखीही अभिनेत्रींच्या ऑडिशन्स


यासोबतच ‘चंद्रकांता’ आणि ‘चंद्र नंदिनी’ ची अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि ‘साथ निभाना साथिया’ फेम तान्या शर्माचंही या मालिकेतील भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली. या मालिकेचे निर्माता महेश भट्ट आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय असून यातील जन्नतची भूमिकाही चांगलीच गाजली आहे.