मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अदिती मलिकच्या (Aditi Malik) चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. तिच्या घरी गोंडस पाहुणा येणार आहे. अदिती मलिक टीव्हीमधील लोकप्रिय अभिनेता मोहित मलिकची (Mohit Malik) पत्नी आहे. हे दोघं खूप दिवसांपासून एकत्र काम करत आहेत. तब्बल १० वर्षांनंतर यांच्या घरी पाहुणा (Aditi Malik Good News)  येणार आहे. मलिक कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या प्रेग्नेसीबद्दल अदिति मलिकने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने मंगळवारी आपल्या इंस्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट करून ही गुड न्यूज दिली. या फोटोत अदिती मलिक आपले बेबी बंप दाखवताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने खास फोटो देखील पोस्ट केले आहेत. 



अदिती मलिकने फोटोसोबतच बाळासाठी एक उत्तम पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणते की,'आमच्या अगोदर देवाला माहित होतं की, आम्हाला तुझी गरज आहे. आपली आत्मा एकत्र आली... चल एकत्र मोठे होऊया ... बेबी मलिक.' अदितीचे बेबी बंपसह असलेले फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. अदिती सोबतच मोहितने देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.



अदितीसोबत चाहते मोहितला देखील शुभेच्छा देत आहेत. चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.