मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये नात्यांना पाहण्याचा दृष्टीकोन चांगलाच बदलला आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या पलीकडेही जाऊन समलैंगिक संबंधांना आता बहुतांश ठिकाणी मान्यता मिळू लागली आहे. अशी नाती असणाऱ्यांना समाजातही स्थान मिळू लागलं आहे. असंच एक नातं सध्या सर्वांच्या नजरेत आलं असून, त्याबाबत कुतूहलही व्यक्त केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, अभिनेत्रीनं तिच्या प्रेयसीशी दिलेली नात्याची ग्वाही. हॉलिवूड चित्रपट, The Twilight Saga मधील लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टनं या चित्रपटाच्या निमित्तानं बरंच नाव कमवलं होतं. 


आता म्हणे ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड Dylan Meyer हिच्याशी तिचा साखरपुडा झाला आहे. ज्यानंतर आता ही जोडी त्यांच्या नात्याना आणखी एका पुढच्या टप्प्यावर नेण्यास सज्ज झाली आहे. 



31 वर्षी क्रिस्टननं बुधवारी Howard stern show मध्ये डिलन मायरशी साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं. इतकंच नव्हे तर लग्नाची तयारीही मोठ्या उत्साहात सुरु असल्याचं तिनं सांगितलं. 


मागील दोन वर्षांपासून डिलन आणि क्रिस्टन एकमेकींना डेट करत आहेत. 2019 मध्ये एका पार्टीत त्यांची ओळख झाली होती. डिलनने क्रिस्टनला लग्नाची मागणी घातली होती. एका सुरेख नात्याची ग्वाही देणाऱ्या या जोडीवरुन सध्या कोणाच्याही नजरा हटत नाही.