यामुळे अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला सांगितलं अभिनय करू नकोस...
असं का म्हणाला अक्षय
मुंबई : बॉलिवूडमध्ये सिनेमांमध्ये आपली खास ओळख निर्माण न करू शकलेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना आपल्या लिखाणामुळे मात्र अतिशय लोकप्रिय आहे. पायजामाज आर फॉरगिविंग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी ट्विंकलने अनेक गुपितं शेअर केली. यातील एक धक्कादायक गुपित म्हणजे खिलाडी कुमारने ट्विंकल खन्नाला अभिनय करण्यास नकार दिला. तसेच अक्षय हे देखील सांगितलं की, आतापर्यंत ट्विंकलने ज्या सिनेमांमध्ये मुख्य कलाकार म्हणून काम केलं त्या सगळ्या सिनेमांवर बंदी आणली पाहिजे.
पुढे ट्विंकल म्हणाली की, अक्षय मला कायम सल्ला देतो की, ही दोन काम तू करू नकोस. यामध्ये एक तर अभिनय आणि दुसरं म्हणजे स्टँडअप कॉमेडी. लोकांना हसवणं माझ्यासाठी काही कठीण नाही. मी खरं बोलते आणि लोकांना खरं ऐकायचं सवय नाही.
1995 मध्ये 'बरसात' या अयशस्वी सिनेमांप्रमाणेच 'इतिहास', 'जुल्मी', 'मेला' सारख्या सिनेमांत काम केलं. 2001 मध्ये ट्विंकलने अक्षयसोबत लग्न केलं आणि सिनेसृष्टीला राम राम केला. 2010 मध्ये तिने 'तीसमार खाँ' या सिनेमात पाहुणी कलाकार म्हणून काम केलं.