` टॉयलेट- एक प्रेम कथा` वर ट्विंकल खन्नाने दिला हा खास मुव्ही रिव्ह्यू
अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा `टॉयलेट एक प्रेमकथा` आज चित्रगृहात प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा 'टॉयलेट एक प्रेमकथा' आज चित्रगृहात प्रदर्शित झाला आहे.
अक्षयची पत्नी ट्विकंल खन्ना हीने हा चित्रपट पाहिल्यानंतर 'मला अक्षयचा अभिमान आहे' असं खास ट्विट केलं आहे.
" टॉयलेट एक प्रेम कथा' मी पाहिला आणि मला हा चित्रपट फारच आवडला . मला माझ्या नवर्याचा अभिमान आहे. हा चित्रपट मनोरंजक आणि महत्त्वत्वपूर्ण आहे. हा चित्रपट नक्की पहायला हवा" अशा शब्दांत ट्विंकलने कौतुक केले आहे.
घराघरात शौचालयांची असलेली गरज आणि उघड्यावर मलविसर्जनाच्या सवयीवर हटके अंदाजामध्ये या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. हागणदारीसारख्या फारशा लक्ष न दिल्या जाणार्या विषयाकडे या चित्रपटामुळे लक्ष दिले जाईल आणि भारतीयांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल दिसतील अशी अक्षयला आशा आहे.
श्री नारायण सिंह द्वारा दिग्दर्शित ' टॉयलेट एक प्रेम कथा ' या चित्रपटात अक्षय कुमार सोबतच भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहेत.