मुंबई : गुरूवारी अचानक बीग बींनी ट्विटर सोडण्याचे संकेत दिल्यानंतर बॉलिवूड आणि बीग बींच्या चाहत्यांमध्ये खळबळ झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरने बीग बींचे फॉलोवर्स कमी केल्याने नाराज होऊन त्यांनी हा संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र फेक फॉलोवर्स टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे. 


40 लाख फॉलोवर्स घटले 


सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह राहणार्‍या अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर अचानक 40 लाख फॉलोवर्स कमी केल्याचा आरोप केला आहे. ट्विटरने हे घटलेले फॉलोवर्स फेक फॉलोवर्स असल्याचे कारण दिले आहे. या बाबतचा इशारा त्यांनी 27 जानेवारीला दिला होता. 


ट्विटरचा खुलासा


ट्विटरवरून माहिती देताना देवुमी सारख्या काही कंपन्या  नियमांचे उल्लंघन करत आहे. ज्यामुळे फेक फॉलोवर्सवर कारवाई करावी लागत आहे.  


 



काय आहे देवुमी ?


देवुमी ही एक अशी कंपनी आहे, जी ट्विटरवर युजर्सना लाखो फेक फॉलोवर्स देण्यास मदत करते. अनेक सेलिब्रिटी अशा कंपन्यांची मदत घेऊन त्यांचे फॉलोवर्स वाढवतात. अमिताभ बच्चनच्या बाबतीतही असेच काही कारण असू शकते. 


अनेक कलाकारांवर टांगती तलवार 


ज्या ट्विटर अकाऊंटनी किंवा सेलिब्रिटींनी कंपन्यांची मदत घेऊन फॉलोवर्स वाढवले आहेत त्यांच्यावर मात्र गाज येऊ शकते.