मुंबई : टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि बोल्ड अभिनेत्री अर्शी खान आणि राखी सावंत अभिनेता राजीव खंडेलवालच्या चॅट शो मध्ये 'जज्बात'च्या सेटवर सेलिब्रेटी गेस्ट म्हणून पोहोचली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये दोघींनीही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ गुपित सांगितल. 



शो ला येताना अर्शी खानने ट्रेडिशनल लुक निवडला तर राखी सावंत बोल्ड अंदाजात दिसली. अर्शीने पिंक कलरची साडी नेसली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसली. केसांमध्ये गजरा घातलेल्या अर्शी खानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  राखीच्या हॉट अंदाजातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.



दोघांच्याही फॅन्सना त्यांचे हे नव्या अंदाजातील फोटो आवडत आहेत.



शो ला जाण्याआधी अर्शी खानने काही व्हिडिओ बनवले होते. 'तेरे रश्के कमर' या गाण्यावर ती डान्स करताना दिसली. अर्शीने राजीवसोबतही काही फोटो शेयर केले आहेत. सध्या अर्शी आणि राखीच्या मैत्रीची सगळीकडेच चर्चा आहे.