Shahrukh Khan: शाहरुख खानच्या `मन्नत`ची भिंत तोडून दोन अज्ञात घुसले, तिसऱ्या मजल्यावर गेले आणि...
Shahrukh Khan House Security Lapse: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुक खान (Shahrukh Khan) याचे चाहते केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. यातील काही चाहते आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशाच एक प्रकार शाहरुख खान सोबत घडला आहे.
Shahrukh Khan House Mannat Security Lapse: बॉलिवूडचा किंग खान गेल्या दोन दशांकहून अधिक काळ चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. शाहरूख खानचे (Shahrukh Khan) चाहते देशभरात आहेत. शाहरुखने जे यश मिळवलं आहे, त्याने घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. शाहरुखचे चाहते त्याला भेटण्यासाठी काहीही करू शकतात. असे दोन युवक होते ज्यांनी शाहरुख खानला भेटण्यासाठी थेट मन्नत (bungalow Mannat) ची भिंत तोडली आहे. ही घटना गुरूवारी घडली असून पोलिसांनी या दोन युवकांना अटक केले आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात (Shahrukh Khan bungalow Mannat) गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास दोन युवक घुसले. या दोघांनी मन्नतची भिंत फोडली आणि शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश केला. हे दोघेही शाहरुक खानचे चाहते असल्याची माहिती मिळत आहे. पण परवानगीशिवाय खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याबद्दल पोलिसांनी या दोघांवरही खटला नोंदविला आहे. या दोघांची चौकशी करून त्यांनी शाहरुख खानच्या घरात का प्रवेश केला हे शोधण्याचा पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणीचा माहिती वांद्रे पोलिसांनी देत असताना त्यांनी सांगितले की, 19 ते 20 वर्षे वयोगटातील दोन युवकांनी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना ताब्यात घेतले आहे.
वाचा: होळीपूर्वी महाराष्ट्रात पावसाच्या धारा, ४ ते ६ मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता
चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितले की, दोघे गुजरातमधून आलो असून आणि त्यांना शाहरुखला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र तरीही या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून या दोघा युवकांकडे असलेल्या मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
खानची झलक पाहण्यासाठी मन्नत बाहेर गर्दी
‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने अभिनेता म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. शाहरुख खान राहत असलेल्या वांद्र्यातील ‘मन्नत’ या बंगल्याविषयी अनेकांना कुतूहल आहे. त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची कायमच गर्दी पाहायला मिळते. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात.
मोठ्या पडद्यावर दिसणार शाहरुख
शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याचा 'पठाण' हा सिनेमा आताच प्रदर्शित झाला. या सिनेमात तो जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणसोबत काम केले. तर या सिनमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने केले आहे. याशिवाय शाहरुख अलावा एटलीच्या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा, नयनतारा असणार आहेत. तसेच किंग खान सलमानच्या 'टायगर ३' सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.