मुंबई : गणपती म्हणजे बुद्धिची देवता. अशा या देवतेची प्रतिष्ठापना काही दिवसांपूर्वीच झाली. गणेशोत्सवाची मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आणि आता या उत्सवाला हळूहळू आणखी रंगत येत आहे. गणपती बाप्पासाठी मखर तयार करण्यापासून आगमनाच्या वेळी परिधान केल्या जाणाऱ्या पेहरावापर्यंत साऱ्या गोष्टींचीच लगबग गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळाली. ज्यानंतर वाजतगाजत बाप्पा आले आणि त्यांच्या सेवेत सर्व भक्तगण लीन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाप्पाची सेवा करतेवेळी हक्काने, देवा मला अमुक दे, देवा माझी ही इच्छा पूर्ण कर असं म्हणणारे याच देवाची आरती करताना त्यांचं एक वेगळं रुप दाखवतात. भक्तीरसात तल्लीन असलेल्या या भक्तांचं हे रुप  काहींना सवयीचं तर काहींना अगदी नवं असतं. 


गणपतीच्या आरतीला उभं राहिलं असता काही नानापरिंचे अवलियासुद्धा नजरेस पडतात. अशाच अवलियाविषयीचा एक व्हिडिओ 'झी मराठी'च्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 'साधारण या उत्सव काळात प्रत्येक ग्रुपमध्ये सर्व गोष्टींसाठी भारीच उत्साही असणारा एक हरहुन्नरी कार्यकर्ता असतोच', असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. 


व्हिडिओमध्ये 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील कलाकार मंडळी बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. ही आरती काही साधीसुधी नाही, कारण त्यात अगदी खालचा सूर लावणाऱ्यांपासून वरच्या सुरापर्यंत आवाज चढवणारे कलाकार पाहायला मिळत आहेत.