एक फ्लॅट बुक करु शकाल इतकी करिनाच्या या ड्रेसची किंमत
करण जोहरचा सिनेमा `कुछ कुछ होता है` ला 20 वर्षे पूर्ण झालंय.
मुंबई : करण जोहरचा सिनेमा 'कुछ कुछ होता है' ला 20 वर्षे पूर्ण झालंय. 1998 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात शाहरुख खान, सलमान खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत अनेक स्टार्स आले होते पण सर्वांच्या नजरा मात्र करिना कपूरच्या ड्रेसवरच खिळल्या होत्या.
करिनाकडेच लक्ष
पार्टीमध्ये करिना गडद काळ्या ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसवर गोल्डन बटणही लावले होते. या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तिचा ड्रेस जेवढा सुंदर होता तेवढाच किंमतीही होता. तिच्या या ड्रेसची किंमत 1 लाख 83 हजार 672 रुपये इतकी होती.
विक्रीसाठीही उपलब्ध
बालमॅन प्लंजचा हा ड्रेस ई कॉमर्स साइटवरही हा विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण त्याच्या इतक्या किंमतीत तुम्ही एखादा फ्लॅट नक्की बुक करु शकता अशीही चर्चा आहे. करिना कपूर पार्टीमध्ये प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा सोबत पोज देताना दिसली. या लुकला परफेक्शन देण्यासाठी तिने स्मोकी आय मेकअप केला तसेच न्यूड लिपस्टिकही लावली होती.
सैफ- करिना एकत्र काम करणार नाहीत
२०१२ साली आलेल्या 'एजन्ट विनोद' या सिनेमात सैफ आणि करीनाची जोडी एकत्र दिसली होती... त्यानंतर या दोघांना एकत्र सिनेमा केलेला नाही. मी यापुढे करीना कपूर खानसोबत कधीही काम करणार नाही.
हे सैफचं वक्तव्य ऐकून कदाचित या दोघांच्या नात्यात काही बिनसलंय का? अशी शंका त्यांच्या चाहत्यांना येऊ शकते... पण, असं काहीही नाही... या निर्णयामागचं सैफचं कारण वेगळंच आहे.
करीना आणि मी एकमेकांसोबत खूप सहज वावरतो.
आणि हीच सहजता चांगल्या सिनेमासाठी घातक ठरते, असं सैफनं एका मुलाखतीत म्हटलंय.
सैफच्या म्हणण्यानुसार, अनोळखी लोकांसोबत काम करणं जास्त मजेशीर ठरतं... कारण हे एक स्वार्थी प्रोफेशन आहे.