मुंबई : आशयपूर्ण संहिता, उत्तम दिग्दर्शन, गुणी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' या चित्रपटाला तर डर्बन येथील 'नेल्सन मंडेला एज्युकेशन ट्रस्ट' येथे चित्रपटाचा 'स्पेशल शो' आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उबुंटू' या झुलू भाषेतील शब्दाचा अर्थ 'मी आहे कारण आपण आहोत' असा होतो. नेल्सन मंडेला यांच्यामुळे या तत्वज्ञानाची देण जगाला मिळाली. शिक्षण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र मानणाऱ्या नेल्सन मंडेल यांच्या भूमीत त्यांच्याच तत्वज्ञानावर आधारीत असणारा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.


आपली शाळा सुरु रहावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या चुणचुणीत मुलांची 'मैतरकथा' मांडणारा हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.