बिग बी उद्धव ठाकरेंचे ऐकत नव्हते.... पण...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे चित्रपटाच्या टीझर लॉन्च सोहळ्यात एक हळूवार क्षण पाहायला मिळाला.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे चित्रपटाच्या टीझर लॉन्च सोहळ्यात एक हळूवार क्षण पाहायला मिळाला.
या सोहळ्यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत उद्धव ठाकरे उपस्थित होते.
बिग बींच्या हस्ते टीझर लॉन्च
सोहळ्याची सुरूवात बाळासाहेबांच्या चित्रपटाच्या टीझरने झाली. बिग बींनी रिमोटद्वारे टीझर लॉन्च केले. त्यानंतर बिग बी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मंचावर बोलावले.
घडलं अस काही
मंचावर तीन खुर्च्या होत्या. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन मंचाच्या उजव्या बाजुच्या शेवटच्या खूर्चीत जाऊन बसले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पंचाईत झाली.
बिग बी ऐकत नव्हते...
उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी बिग बींना मध्यभागी असलेल्या खूर्चीत बसण्याची विनंती केली. पण बिग बी काही ऐकत नव्हते. ते आपल्या खुर्चीवरून उठायला तयार नव्हते. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की या खूर्चीवर तुम्ही बसा. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांना मान देण्यासाठी त्यांना विनवणी करत होते.
अखेर बिग बींनी विनंती मान्य केली आणि ते मधल्या खूर्चीवर जाऊन बसले. ते मधल्या खूर्चीवर बसल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.