मुंबई : ठराविक दृश्यांना जिवंत करणाऱ्या 'व्हिएफएक्स' या तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. वेगवेगळ्या कथा, संगीतातील नवनवीन प्रयोग, अभिनय कौशल्य या सर्व बाबी आल्याचं परंतु आता सर्वात जास्त बारकाईने पाहिले जाते ते 'व्हिएफएक्स' कडे. त्यामुळे चित्र अधिक उठावदार दिसते. मराठीत चित्रपटाला सध्या चांगले दिवस आलेले आहेत अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक ऍनिमेशन जगातील नामवंत कंपनी "आयरिऍलिटीज" मराठीत कधीही न झालेला प्रयोग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी प्रयोगाने आपलं नावलौकिक केल्यानंतर आता "आयरिऍलिटीज" कंपनीची पाऊले मराठीकडे वळले आहेत.


हॉरर आणि सस्पेंस या दोन सर्वात ताकदीच्या पण तेवढ्याच आव्हानात्मक विषयांवर तब्बल १०० लघुपटांची निर्मिती करणार आहे. हा मराठी सिनेसृष्टीतील पाहिलावहिला प्रयोग असल्याने सर्वांचे लक्ष या अनोख्या प्रयोगाकडे वेधलेलं आहे.


'जोशात आम्ही मराठी सिनेक्षेत्रात झेप घेत आहोत. १०० लघुपटांचे आव्हान जितके मोठे आहे तितकंच आयरिऍलिटीज साठी सोप्प कारण त्यांचा स्वतःचा स्वतंत्र व्हिएफएक्स स्टुडिओ असल्यामुळे भविष्यात चित्रपट संकलन करणे सोईस्कर जाणार आहे.' असे मत निर्माते प्रसाद अजगांवकर यांनी व्यक्त केलं आहे.